Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

जनतेचे आभार व्यक्त करतो, निवडणुकीत भाजपचा विजयाबद्दलच नव्हे तर, लोकशाहीचा बळकट केल्याबद्दल जनतेचे आभार: पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप्रणित एनडीएला मिळालेल्या यशानंतर दिल्लीत बुधवारी (11 नोव्हेंबर) रात्री भाजपच्या मुख्यालयात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.
जनतेचा आभार व्यक्त करतो मी आज महान देशाच्या महान जनतेचा आभार व्यक्त करतो. जनतेने निवडणुकीत पाठिंबा दिला म्हणून फक्त मी धन्यवाद मानत नाही तर जनतेने लोकशाहीच्या या महान पर्वाला मोठ्या उत्साहात साजरा केला. निवडणूक काही विभागात झाली असेल पण काल सकाळपासून रात्री उशिरापर्यंत संपूर्ण देशाचं लक्ष टीव्ही, ट्विटरवर होतं. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर होती. लोकशाहीप्रती भारतीयांची जी आस्था आहे त्याचं उदाहरण संपूर्ण भारतात कुठेही नाही


बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येवर भाष्य

जे लोक लोकशाही पद्धतीने आपला सामना करु शकत नाही, आपल्याला आव्हान देऊ शकत नाही, असे काही लोक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा मार्ग अवलंबला आहे. देशाच्या काही भागात त्यांना वाटतं भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या करुन ते आपला हेतू साध्य करतील. मी त्यांना अगदी आग्रहाने समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मला इशारा देण्याची गरज नाही. कारण इशारा देण्याचा काम जनताच करेल. निवडणुका येतात-जातात. जय-पराजय होत राहतात. सत्तेवर कधी हा बसेल, कधी तो बसेल, मात्र हा हत्येचा खेळ लोकशाहीत कधीही यशस्वी होणार नाही. मृत्यूचा खेळ खेळून कुणालाही मतं मिळवता येणार नाही. हे भिंतीवर लिहिलेले शब्द एकदा वाचून घ्या.

बिहार सगळ्यात खास

बिहार सगळ्यात खास आहे. जर तुम्ही मला बिहार निकालाबाबत विचारणार तर जनतेनं जसं स्पष्टपणे मत दिलंय, तसंच माझंही उत्तर आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राचा विजय झाला आहे. बिहारचा गरिब, माता-बघिनी, प्रत्येक घटक जिंकला आहे

शांततापूर्वक निवडणूक पार पाडल्याबद्दल धन्यवाद

निकालात हार-जीत आपल्या जागेवर आहेत. पण निवडणुकीची प्रक्रिया प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा विषय आहे. त्यामुळे मी प्रत्येक भारतीयाचं अभिनंदन करतो. कोटी कोटी देशवासियाचं धन्यवाद मानतो. निवडणुकीला शांततेपूर्ण आणि यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल निवडमूक आयोग, देशाची सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासनाचंही अभिनंदन करतो.

निवडणुकीत आता हिंसाचार होत नाही

काही गोष्टी तर आम्ही विसरलो आहोत. काही वर्षांपूर्वी निवडणूक व्हायची तेव्हा दुसऱ्यादिवशी किती बुथ लुटले गेले, अशाप्रकारच्या बातम्या यायच्या. मात्र, आज मतदानाचा टप्पा किती वाढला, किती महिलांचं मतदान वाढलं, याबाबत बातम्या असतात. पूर्वी बिहारच्या निवडणुकीत किती लोक मारले गेले, किती बुथ लुटले गेले, अशाच बातम्या असायचा. मात्र, आता शांततेपूर्ण मतदान होणं, कोरोना संकटात मतदानासाठी लोकं घराबाहेर पडले, हीच तर खरी ताकद आहे.

कोरोना संकटात निवडणूक सोपी नव्हती

कोरोना संकटात निवडणूक करणं सोपं नव्हतं. पण आपल्या व्यवस्था इतक्या मजबूत आहेत की, संकट काळात निवडणूक घेऊन भारताची ताकद दाखवली. या निवडणुकीत भाजप आणि एनडीएला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचं जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे.

भाजप देशाच्या कानाकोपऱ्यात

कधी काळी भाजपचे छोटसं कार्यालय होते. पण आज तोच पक्ष भारताच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात आहे. प्रत्येकाच्या हृदयात आज भाजप आहे. हे कसं झालं? त्याचं उत्तर काल जे निकाल आले त्यात मिळतं.

काल जे निकाल आले त्याचा अर्थ खोल आहे. त्याचे उद्दीष्टे खूप मोठे आहेत. लोकसभा निवडणुकीत जे निकाल आले होते, त्याचे कालचे निकाल हे विस्तार आहेत. भाजप पूर्वेत जिंकला. भाजपला गुजरात, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटकात विजय मिळाला. दोन केंद्रशासित प्रदेशातही निवडणूक झाली. लड्डाख, दिव-दमनमध्ये भाजचा विजय झाला.

8) काम केलं तर जनता तुमच्यासोबत

21 व्या शतकाचे भारताचे नागरिक वारंवार आपला संदेश स्पष्ट करत आहेत की, आता सेवा करण्याची संधी त्यांनाच मिळेल जे प्रामाणिकपणे जनसेवा करतील. देशासाठी काम करा, देशाच्या कामाशीच मतलब ठेवा, हेच देशाच्या नागरिकांचं म्हणणं आहे.

तुम्ही काम केलं तर लोकांकडून आशीर्वादही मिळेल हे कालच्या निकालांनी स्पष्ट केलं. तुम्ही 24 तास देशाच्या विकासासाठी विचार करणार, मेहनत करणार, देशासाठी स्वत:ला समर्पित करणार, तर त्याचे चांगले परिणामही दिसतील. देशाची जनता तुमच्या मेहनत, तपश्चरिया, निती बघत आहे. त्यामुळेच देशाच्या जनतेनं निवडलं.

9) विकास हाच आधार

देशाच्या राजनितीचा मुख्य आधार हा विकास हाच आहे. बँक खाते, गॅस कनेक्शन घर, चांगले रस्ते, रेल्वे स्टेशन, विमानतळ, शाळा हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. आज खूप मोठी कसोटी आहे. येत्या काही दिवसात विकास हाच निवडणुकीचा आधार असेल. एनडीएवर जनता जो स्नेह दाखवला त्याचं कारण विकास आहे. देशाला पुढे नेण्यासाठी काम करत राहणार, असा मी विश्वास देतो.

10) भाजप प्रत्येक घटकाचा पक्ष

भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्यात गरिब, पीडित, दलित, शोषित, वंचित आपलं भविष्य बघतात. देशातील प्रत्येक घटकाचा विचार भाजप केला जातो.

भाजपवर लोकांचा आशीर्वाद आणि स्नेह निरंतर वाढत चालला आहे. बिहारमध्ये पक्षाने अगोदरपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून सरकारमध्ये वापसी केली आहे. गुजरातमध्ये भाजप 90 व्या दशकापासून आहे. मध्यप्रदेशातही भाजप सत्तेत आहे. देशातील नागरिक भाजपवर सर्वाधिक विश्वास ठेवत आहेत.

12) महिला या भाजपच्या सायलंट व्होटर

सध्या सायलंट व्होटरची चर्चा आहे. भाजपजवळ सायलंट व्होटरचा एक असा वर्ग आहे जो वारंवार व्होट देत आहे. हा सायलंट व्होटर म्हणजे देशाची नारीशक्ती. ग्रामीन ते शहरी भागात महिला मतदारचं भाजपची सर्वात मोठी सायलंट व्होटर आहे.

13) कोरोना काळात वाचलेला प्रत्येक जीव भारताच्या यशाची कहानी

कोरोना आला तेव्हा हे संकट किती भयंकर आहे त्याचा अंदाज मोठमोठे देश लावू शकले नाहीत. मात्र, कोरोनाविरोधात भारताने जशी लढाई दिली तशी कुणीही दिली नाही. कोरोना काळात वाचवलेला प्रत्येक जीव भारताच्या यशाची कहानी आहे.

14) परिवारवादी पक्ष लोकशाहीसाठी धोकादायक

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत परिवारवादी, परिवाराचे पक्ष यांचं जे जाळं नजर येत आहे हे लोकशाहीसाठी धोकादायक बनत चालले आहेत. परिवारवादी पक्ष लोकशाहीला खूप मोठा धोका आहे.

देशाची एक राष्ट्रीय पार्टी एक परिवारात फसली आहे. ही पार्टी फक्त एका परिवाराची पार्टी बनली आहे. अशावेळी भाजपचं दायित्व आणखी वाढतं. आम्हाला आमच्या पक्षाला लोकशाहीचं जीवंत उदाहरण बनवायचं आहे. त्यामुळेच देशाचा पंतप्रधान भर सभेत ‘नेताजी आगे बडो हम तुम्हारे साथ है’ असा नारा देतो.

15) लोकल उत्पादनासाठी आग्रही व्हा

लोकल उत्पादनासाठी आग्रही व्हा. जगभरातील कुणीही आपल्याला दाबू शकणार नाहीत. तुम्ही विश्वास ठेवा.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close