Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्जसंपादकीय

क्ष-किरण तंत्रज्ञांचे आरोग्य धोक्यात! अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा वाढला भार रेडीएशनचा धोकाही वाढला

@रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर व अत्यवस्थ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक्स रे, सिटी स्कॅनची आवश्यक भासते. गेल्या सहा महिन्यात ही संख्या वाढल्याने राज्यातील कामगार विमा रुग्णालयासह इतर शासकीय-निमशासकीय रुग्णालयात कार्यरत क्ष-किरण तंत्रज्ञ , क्ष सहाय्यक व अंधार खोली सहाय्यकांवर कामाचा ताण वाढलेला आहे. मनुष्यबळ कमी असतानाही हे कर्मचारी आरोग्य धोक्यात घालत चोखपणे कर्तव्य बजावत आहे. मात्र मूलभूत सोयीसुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचारी वर्गांतून संताप व्यक्त होत आहे.
राज्यातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयातील क्ष-किरण तंत्रज्ञ, क्ष-किरण सहायक यांची जवळपास साठ टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोना बाधीतांबरोबरच अन्य आजारांच्या रुग्णांनाही एक्स रे, सिटी स्कॅन करण्यासाठी चार-चार तास थांबावे लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक आरोग्य विभागाची ग्रामीण व जिल्हा रुग्णालय, कामगार विमा योजना रुग्णालय व इतर शासकीय निमशासकीय रुग्णालयातील क्ष किरण विभागात अशी स्थिती आहे.
शासनाने तत्परतेने कोविड रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात पोर्टेबल क्ष-किरण यंत्र खरेदी केली आहेत. परंतु ही यंत्रे हाताळण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञ, सहाय्यकाची पदे भरलेली नाहीत. त्यामुळे कमी वेळेत संशयित व बाधितांचे छातीचे एक्स रे काढताना क्ष-किरण तंत्रज्ञांना मोठी कसरत करावी लागत आहे. यातून रेडिएशनचाही धोका वाढल्याने आमचे आरोग्य धोक्यात आल्याची प्रतिक्रिया अनेक कर्मचारी व्यक्त करत आहेत.
आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्ष-किरण व सिटी स्कॅन विभागात 24 तास म्हणजे तीन पाळयामध्ये तंत्रज्ञ व सहाय्यक उपलब्ध असणे आवश्यक असते. परंतु सर्व शासकीय रुग्णालयात तंत्रज्ञ व सहाय्यकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे हे शक्य होत नाही. वर्षानुवर्षे रिक्तपदे भरलेली नाहीत. त्यात आमच्या पदोन्नत्या प्रलंबित आहे, अशी खंत क्ष- किरण विभागातील कर्मचारी व्यक्त करत आहेत. संकटकाळात आम्ही चोखपणे कर्तव्य बजावत असताना आमच्या मुलभूत प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे क्षकिरण कर्मचाऱ्यांत संतापाची भावना आहे.
संशोधन विभागातील क्षकिरण तंत्रज्ञ पदोन्नतीचा विषयही पाच वर्षांपासून धूळखात पडला आहे. शासनाला आमचे हाल व प्रश्न दिसत नाहीत का? असा संतप्त सवाल अनेक क्षकिरण कर्मचार्‍यांनी बोलताना व्यक्त केला.

थोडी भिती अन् धास्तीही

वैद्यकीय क्षेत्रात क्ष-किरण (रेडिओलाॅजी ) विभागाला विशेष महत्त्व आहे. क्ष-किरण तंत्रज्ञ क्ष-किरण सहायक,अंधार खोली सहाय्यक,सी.टी.तंत्रज्ञ हे अत्यावश्यक सेवेत येतात. या पदांना रुग्णसेवेचा पाठीचा कणा म्हटले जाते. राज्यातील बहुतांश रुग्णालय कोविड साठी रेड झोन बनत चालली असताना मनात थोडी भिती, धास्ती असतानाही शक्य तितकी स्वत:ची काळजी घेऊन हे कर्मचारी कर्तव्य निभावत आहेत

बाळासाहेब जोगदंड क्ष किरण तंत्रज्ञ राज्य कामगार विमा योजना रुग्णालय औरंगाबाद

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close