Subscribe to our Newsletter
Loading
Uncategorized

कल्याणमधील फ्लॅटमध्ये सुरू होता सेक्स रॅकेट, 4 बांगलादेशी महिला अटकेत

कल्याण : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र थर्टी फस्ट पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. अशातच कल्याणमध्ये एका फ्लॅटमध्ये देहविक्रीचा (Sex racket) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका तरुणासह 4 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली. शनिवारी संध्याकाळी कल्याण पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील एका घरात छापा टाकून देहविक्रीचा पर्दाफाश केला आहे.

हाजीमलंग रोडवर एका फ्लॅटमध्ये देहविक्री केली जात असल्याचा माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून फ्लॅटवर धाड टाकली.

यात पोलिसांनी मोहन उर्फ सनातन सुरेंद्र बर्मन याच्यासह चार बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. या प्रकरणात जितू नामक आरोपी फरार असून त्याच शोध सुरू आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरिक्षक अशोक कडलक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला घरी एकटी असल्याचे पाहून परिसरातील सराईत गुन्हेगार महेश वाघ महिलेच्या घरात घुसला आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून महिलेवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. पीडितेनं पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

शुक्रवारी 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी माहिती दिली आहे. ‘आरोपी महेश रमेश वाघ ऊर्फ मक्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने जबदस्ती महिलेच्या घरात घुसण्याच्या प्रयत्न केला. त्याने धारधार शस्त्र दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने यासंबंधी तक्रार केल्यानंतर अरोपीला अटक करण्यात आली. या आरोपीवर याआधीही चार गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close