Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षणऔरंगाबाद

औरंगाबादमध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र वैद्य यांनी घेतली पहिली कोरोना लस

  • औरंगाबाद :गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत संसर्गाला रोखण्याच्या दिशेने लसीकरणाची सुरुवात हे एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी आज जिल्ह्यातील लसीकरण शुभारंभ प्रसंगी केले.
    रेल्वे स्टेशन रोडवरील बंसीलाल नगर मनपा आरोग्य केंद्र येथे औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेची सुरुवात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आ. संजय शिरसाठ, अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तीक कुमार पांडेय, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्यासह संबंधित मान्यवर, लसीकरण लाभार्थी उपस्थित होते.
    यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, आज देशभरात लसीकरण मोहिमेची सुरुवात होत असून जिल्ह्यातही आज 10 केंद्रांवर एक हजार जणांना लस देण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरापासून आपण सर्वांच्या साथीने कोरोना विषाणुविरोधात जो लढा देत आहोत त्यातील एक महत्वाचे आणि दिलासादायक पाऊल आपण लसीकणाच्या माध्यमातून आज टाकत आहोत ते निश्चितच यशस्वी होईल, असे सांगून श्री. देसाई म्हणाले, कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील असून या लसीमुळे आपल्या सर्वांना या रोगापासून संरक्षण प्राप्त व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. ती यशस्वी होत सर्वांना आरोग्य लाभावे अशा शुभेच्छा लसीकरण मोहिमे निमित्त व्यक्त करत श्री. देसाई यांनी डॉक्टर, आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचारी तसेच इतर सर्व यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे संसर्गाचे वाढते प्रमाण वेळीच रोखू शकलेलो आहोत. त्याचप्रमाणे जिल्हयात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढते राहिलेले असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने सुरु असलेले आपल्या सर्वांचे प्रयत्न यशस्वी होतील, याची खात्री आहे. कोरोना लसीविषयी लोकांच्या मनात कोणतीही शंका उपस्थित होऊ नये, म्हणून आम्ही डॉक्टरांनी पहिल्यांदा लस टोचून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे आम्ही लस टोचून घेतली आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाची पहिली लस घेण्याचा मान मला मिळाला आहे, असे डॉ. राजेंद्र वैद्य यांनी सांगितले. लस घेतल्यानंतर 15 मिनिटे झाली तरी कोणताही त्रास जाणवत नाही, परंतु लस घेतली तरी सर्व नियमांचे पालन करा. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात स्वच्छ धुवा, सॅनिटायरचा वापर करा, या गोष्टींची खबरदारी घ्या, असेही डॉ. वैद्य म्हणाले.
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close