Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबादच्या विकासाकरिता पुढाकार घ्या ,औरंगाबाद फर्स्टचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे

mh20live Network

औरंगाबाद: औरंगाबाद हे आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर म्हणून प्रसिद्ध झाले होते. आता ही ओळख पुसत चालली आहे. आता ही ओळख पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतीश चटर्जी यांनी विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी (ता. २३) केली. यावेळी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देण्यात आले.

यावेळी त्यांच्या समवेत औरंगाबाद फर्स्टचे सचिव रणजीत कक्कड, कोषाध्यक्ष अनिल माळी, माजी अध्यक्ष राम भोगले, मानसिंग पवार, रवींद्र कोंडेकर, अशोक काळे, अरुण सेन गुप्ता, रमेश नागपाल, मुनिष शर्मा, प्रशांत देशपांडे, उल्हास गवळी यांची उपस्थिती होती.

श्री. चटर्जी म्हणाले कि,  मराठवाड्याची राजधानी, दहा लाख देशांतर्गत पर्यटक, ४० हजार आंतरराष्ट्रीय पर्यटक, चार हजार उद्योग, दहा हजार एकरावर पसरलेला दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर, तीस हजार महाविद्यालयीन विद्यार्थी असलेले शहर आणि दरवर्षी ११ हजार कोटी कर देणारे औरंगाबाद शहर आहे. मात्र पाणीप्रश्न, पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, विमानसेवा, घनकचरा व्यवस्थापन करण्यात यश आलेले नाही. आजवर याबाबत चर्चा आणि आश्वासने बरीच मिळाली. पण कृती झालेली नाही. त्यामुळे आपण खंबीरपणे या बाजू केंद्र आणि राज्य सरकारकडे मांडून औरंगाबाद शहराला न्याय द्यावा.

यावर श्री. फडणवीस म्हणाले कि, औरंगाबादसह मराठवाड्याच्या विकासासाठी माझ्यासह भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. त्यासाठी जे काही शक्य असेल ते ते निश्चितच करणार. आपल्या मागण्या निश्चितच केंद्र आणि राज्याकडे मांडून न्यायासाठी लढणार. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close