Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

अतिरिक्त देयक आकारणाऱ्या 14 खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांद्वारा कारणे दाखवा नोटिस जारी

औरंगाबाद, दि.06,:- औरंगाबाद शहरातील 14 खासगी रूग्णालयांनी कोरोना उपचारासाठी वैद्यकीय देयकांमध्ये  44 लाख 77 हजार 131 रूपये इतकी ज्यादा रक्कमेची आकारणी केल्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या द्वारा संबंधित रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस  बजावण्यात आली आहे.

खासगी रूग्णालयांनी शासनदराने कोरोना उपचार करणे बंधनकारक असून  या बाबत महाराष्ट्र शासनाचे धोरण, वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, मार्गदर्शक सुचनांनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येत असलेली देयके ही अवाजवी आकारली जाऊ नये म्हणून सदर देयकांची तपासणी करणे करता औंरगाबाद शहरात जिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशान्वये लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे .

 सदर लेखापरीक्षकांनी रुग्णालयांना दैनंदिन भेटी देऊन वेळोवेळी लेखापरीक्षणाचे काम केलेले आहे.  दिनांक 23 सप्टेंबर, 2020 ते 1 मे, 2021 या कालावधीमध्ये खालील नमूद रुग्णालयांनी शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा ज्यादा दराची आकारणी करून रुग्णांकडून वैद्यकीय बिलामध्ये जास्तीची रक्कम वसूल केल्या बाबत लेखापरीक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अहवाल सादर केलेला आहे. तसेच जिल्ह्यामध्ये विविध माध्यमे दूरचित्रवाणी, वृत्तपत्रे तसेच नागरिकांकडून वैद्यकीय देयकांच्या अवाजवी आकारणीबाबत तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होत आहेत.  त्या अनुषंगाने सदर रुग्णालयांना जादाची आकारणी केलेली रक्कम रुग्णांना परत करणेबाबत प्राथमिक कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. सदर रक्कम रुग्णालयांनी रुग्णास परत न केल्यास सदर रुग्णालया विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 खंड 2 3 4 मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र शासनाकडील दिनांक 30 ऑगस्ट, 2020 अधिसूचना मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे कारणे दाखवा नोटीसमध्ये नमूद केले आहे.

कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या रुग्णालयांची नावे व रुग्णास परत करावयाची रक्कम पुढीलप्रमाणे :-

अनु.क्र. रुग्णालयांचे नावरक्कम
1हेडगेवार हॉस्पीटल29064
2धुत हॉस्पीटल688183
3सुमनांजली हॉस्पीटल8113
4आशिष हॉस्पीटल70400
5धनवई अँण्ड सिंग हॉस्पीटल12200
6मेडिकव्हर हॉस्पीटल49271
7सनशाईन हॉस्पीटल56500
8ओरियन सिटी केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पीटल39400
9ईश्वर हॉस्पीटल16000
10ग्लोबल इंटरनॅशनल हॉस्पीटल399000
11एशियन सिटी केअर सुपर स्पेशलिटी5900
12अजंठा हॉस्पीटल11000
13वायएसके हॉस्पीटल4600
14कृष्णा हॉस्पीटल3087500
 एकूण44,77,131
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close